Friday , June 19 2026
Breaking News

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाला विरोध; ‘करवे’चे पोलीस आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ आणि २७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (करवे) शिवरामेगौडा गटासह काही कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून या आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

करवेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत आक्षेप नोंदवित, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी भूमिका मांडली. यावेळी करवेचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी यांनी आंदोलनास परवानगी दिल्यास तीव्र विरोध केला जाईल, असेही वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थकांकडून हा विरोध मराठी भाषिकांच्या लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सीमाभागातील भाषिक हक्क आणि विविध मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी भूमिका समोर येत असल्याने या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

या निवेदनावेळी महादेव तळवार, बळराम मासेनट्टी, बाळप्पा गुडगेनट्टी यांच्यासह कन्नड संघटनांचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चिकोडीतील गुरुवार पेठेत भीषण आग; जयश्री गारमेंट्ससह शेजारील घरांचे मोठे नुकसान

Spread the love  चिकोडी : शहरातील गुरुवार पेठ परिसरात संशयित शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून जयश्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *