Wednesday , August 19 2026
Breaking News

महाराष्ट्रातून दोन टीएमसी पाणी मिळणे अशक्य

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातही पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे तेथून दोन टीएमसी पाणी मिळणे सध्या तरी शक्य नसल्याची माहिती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातही पाणीटंचाईची समस्या भासत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी बेळगावला पाणी देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. शिवाय यावर्षीच नव्हे तर यापूर्वीच्या वर्षातही राज्य सरकारने महाराष्ट्राकडे अनेकदा विनंती केली होती मात्र अपेक्षित प्रमाणात पाणी मिळाले नाही कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही महाराष्ट्र सरकारने पाणी सोडण्यास पुढाकार घेतला नव्हता सध्या महाराष्ट्रातही पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.
बेळगाव शहरासाठी पुढील दोन महिन्यांसाठी पुरेसा पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही ज्या भागात पाण्याची कमतरता निर्माण होईल तेथे टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक ते त्या सूचना करण्याचे ही त्यावेळी सांगण्यात आले आहे.
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरू असली तरी काही भागात 15 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत मात्र उपलब्ध पाणीसाठा वितरण तांत्रिक अडचण या सर्व बाबींचा विचार करून सध्या पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले..

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *