

बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अलीकडील कारवाईनंतर उद्योजक वाय. मंजुनाथ हे तातडीने बेळगावात दाखल झाले आहेत. शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कायदेशीर सल्लामसलत आणि पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ यांनी प्रसिद्ध सनदी लेखापरीक्षक (सीए) पी. जी. गाळी यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. दोघांमध्ये सुमारे तीन तास सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत ईडीकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची पडताळणी तसेच संभाव्य चौकशीला सामोरे जाण्यासंदर्भातील विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीच्या नोटिसांना उत्तर देणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तयारी करणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर मंजुनाथ यांच्या हालचालींना वेग आल्याने बेळगावच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta