Thursday , June 25 2026
Breaking News

बेळगाव येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भव्य हॉकी मैदान साकारणार

Spread the love

 

खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाची सकारात्मक बैठक!
बेळगाव : बेळगाव हे क्रीडा क्षेत्रातील, विशेषतः हॉकीचे ‘पंढरी’ म्हणून ओळखले जाते. बेळगावच्या रक्ताने नेहमीच हॉकीचा वारसा जपला आहे. पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉकीचे सामने खेळवले जात होते. हाच ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आणि बेळगावच्या खेळाडूंना हक्काचे मैदान मिळवून देण्यासाठी ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या वतीने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सकल मराठा समाज व भाजपचे ज्येष्ठ नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘हॉकी बेळगाव’च्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे खासदार माननीय जगदीश शेट्टार आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचनवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून निधी आणणार: खासदार जगदीश शेट्टार
या बैठकीत बेळगावच्या हॉकी मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार जगदीश शेट्टार यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,
केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेच्या अंतर्गत युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय) या मैदानासाठी विशेष निधी आणि मंजुरी आणली जाईल. या प्रपोजलचा आपण स्वतः दिल्लीत वैयक्तिक रित्या १००% पाठपुरावा करू आणि बेळगावात भव्य हॉकी मैदान तयार करून घेऊ.”
प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू
खेळाडूंच्या भावनेचा आदर करत कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचनवार यांनी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. मैदाना संदर्भातील हा प्रपोजल केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीच्या वेळी कॅन्टोन्मेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (कार्यकारी अभियंता) सतीश मनोलकर हे देखील उपस्थित होते, ज्यांच्यावर या प्रस्तावाच्या तांत्रिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी असेल.
बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या ऐतिहासिक बैठकीच्या वेळी ‘हॉकी बेळगाव’चे मुख्य पदाधिकारी आणि शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये किरण जाधव (भाजप नेते व सकल मराठा समाज नेते),
घुळाप्पा होसमणी (‘हॉकी बेळगाव’ पदाधिकारी), सुधाकर चाळके (सेक्रेटरी, ‘हॉकी बेळगाव’), प्रकाश बेळगोजी, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, सागर पाटील, सविता वेसणे यांच्यासह संघटनेचे इतर अनेक पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेते किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘हॉकी बेळगाव’च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. बेळगावच्या मातीतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी खेळाडू घडावेत, या दृष्टीने हे मैदान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरु; सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश

Spread the love  बेळगाव : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू असून सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *