

निपाणी (वार्ता) : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सुनील नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव येथे सोमवारी (ता. २९) जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध गटासाठी आकर्षक बक्षीसे देण्यात येणारअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नावर यांनी दिली. बोरगाव येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बसन्नावर म्हणाले, सोमवारी दुपारी तीन वाजता जय शिवराय चौकत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष गणेश ईळीगार, राज्य गौरव अध्यक्ष दरीखाना आज्जा, सुनील पाटील हे उपस्थित राहणार असे सांगितले. जनावर प्रदर्शनात बिन दाती सिंगल, दोन दाती, चार दाती व सहा दाती, जनरल बडाव बैल जोडी, चॅम्पियन व खिलार गाय व वासरू असे गट करण्यात आले आहेत.
बिन जाती सिंगलसाठी ३, २, व १ हजार, दोन दाती चार दाती व सहा दाती या गटास ५ हजार, ३ हजार, व २ हजार, बडाव बैल जोडी जनरल गटासाठी ५ हजार, ३ हजार, व २ हजार तसेच चॅम्पियन गटासाठी ५ हजार ३ हजार व २ हजार आणि खिलार गाय व वासरू जनरल गटासाठी ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांचे रोख बक्षीस निशाणा व शिल्ड देण्यात येणार आहे. बैठकीस सुनील-नांगरे पाटील, रमेश मालगांवे, आदिनाथ जंगटे, भरत हवले, जमील अत्तार, अभिनंदन फिरगन्नावर, अभय पाटील, शितल सोबाने, शितल गोरवाडे, उदय पवार, प्रकाश मालगावे, राजगोंडा पाटील, राजू पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta