Sunday , August 16 2026
Breaking News

शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरु; सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू असून सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म. ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे केले होते. यावेळी व्यासपीठावर म. म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, शिवाजी विद्यापीठातील समन्वयक डॉ. सचिन भोसले, डॉ. नगिना माळी व मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते.
डॉ. भोसले व डॉ. माळी यांनी विविध अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्सेस, अभ्यास केंद्राची माहिती, शैक्षणिक आणि करिअर विकासाच्या संधी याबद्दल माहिती दिली. तसेच पदवी घेवू इच्छिणारे युवक-युवती स्पर्धा परिक्षेचे अभ्यासार्थी, सैनिक, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, शेतकरी, कामगार या सर्वांच्यासाठी दूरशिक्षणाची माहिती सांगितली.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना विनय शिंदे व डॉ. सचिन भोसले यांनी उत्तरे दिली.
यावेळी म. ए. समिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सुरज कुडुचकर, महेश जुवेकर, सुहास हुद्दार आदिसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *