Sunday , August 16 2026
Breaking News

बेळगाव शहरात जप्त अंमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ५७.७८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांचा गुरुवारी (२५ जून) वैज्ञानिक व नियमानुसार नाश करण्यात आला.

पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या २४ प्रकरणांतील जप्त मालाचा यात समावेश होता. यामध्ये २४ किलो १३१ ग्रॅम ४५ मिलीग्रॅम गांजा (अंदाजे किंमत १०.७६ लाख रुपये), १२० ग्रॅम ८३ मिलीग्रॅम हेरॉईन (अंदाजे किंमत ८.०२ लाख रुपये) तसेच १३ किलो ९४५ ग्रॅम हशीश (अंदाजे किंमत ३९ लाख रुपये) असा एकूण ३८ किलो १९७ ग्रॅम २८ मिलीग्रॅम अंमली पदार्थांचा समावेश होता. या जप्त अंमली पदार्थांची एकूण अंदाजित किंमत ५७ लाख ७८ हजार ९०० रुपये इतकी आहे.

ही कारवाई ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष, पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), सीसीआरबी विभागाचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी तसेच कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळ, औषध नियंत्रण विभाग आणि कारखाना व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

सौन्दत्ती तालुक्यातील हारुगोप्पा येथील बेळगाव ग्रीन एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पात पर्यावरणपूरक व वैज्ञानिक पद्धतीने अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.

पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *