Wednesday , August 19 2026
Breaking News

वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे, सकल मराठा समाज बेळगाव वतीने सोमवारी ‘महाआरती’ आयोजन

Spread the love

 

सकल मराठा समाज बेळगावचे जाहीर आवाहन: १८ पगड आणि १२ बलुतेदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगावचा बहुसंख्य असलेला मराठा समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून शेतीवरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात वरुणराजाने आणि निसर्गाने बळीराजाला उत्तम साथ द्यावी, पिकांची चांगली भरभराट व्हावी, आणि पर्यायाने शेतकरी व बहुजन समाजाचे कल्याण व्हावे, या उदात्त हेतूने सोमवार, दिनांक २९ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दक्षिण काशी म्हणून अत्यंत पवित्र मानले जाणारे बेळगावचे श्री क्षेत्र कपिलेश्वर तीर्थ मंदिर येथे सायंकाळी ठीक ७:०० वाजता समस्त मराठा समाजाच्या वतीने देवा चरणी ‘गाराणे’ घालून ‘महाआरती’ करण्यात येणार आहे.
प्रमुख आयोजक आणि नेतृत्व सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या वतीने या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने: किरण जाधव (नेते, सकल मराठा समाज), रमाकांत कोंडुसकर (नेते, सकल मराठा समाज), रणजित चव्हाण पाटील (ज्येष्ठ नेते, मराठा समाज), सागर पाटील (समन्वयक, मराठा समाज), कपिल भोसले (समन्वयक, मराठा समाज), प्रकाश बेळगोजी (समन्वयक, मराठा समाज) यांच्यासह मराठा समाजातील इतर अनेक प्रमुख नेत्यांचा पुढाकार आहे.
सर्व समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन “आपल्या बळीराजाला समाधानकारक पाऊस मिळावा, हवामान अनुकूल राहावे, शेती पिकांची उत्तम भरभराट होऊन सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, हीच या गाराण्यामागची मुख्य भावना आहे. यासाठी केवळ मराठा समाजच नव्हे, तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार सर्वच जाती-जमातींच्या प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
वार आणि दिनांक : सोमवार, २९ जून
वेळ : सायंकाळी ठीक ७:०० वाजता
ठिकाण: श्री कपिलेश्वर तीर्थ मंदिर (दक्षिण काशी), बेळगाव.
निमंत्रक : सकल मराठा समाज, बेळगाव.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव महापालिका बरखास्तीच्या उंबरठ्यावर?

Spread the love  प्रादेशिक आयुक्तांची कठोर भूमिका; आयुक्तांकडून तीन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला सत्ताधारी-विरोधकांच्या संघर्षाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *