Wednesday , August 19 2026
Breaking News

‘या हुसेन, या हुसेन’च्या जयघोषात निपाणी परिसरात मोहरम सण साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी शहरातील विविध भागामध्ये ताबूत मिरवणूक काढून नेहरू चौक, निपाणकर राजवाडा येथे मोहरम सणाची सांगता करण्यात आली.
श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर राजवाड्यमध्ये मोहरम सणाची सुरुवात झाली. निपाणी संस्थांनाचे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी उद घालून पिरपंजांची स्थापना करून पाच दिवस पीर पंजांची सेवा करण्यात आली. सणाकरिता मानकरी अंबादास चितारे यांच्या हस्ते ताबूत सजविण्यात आला होता. निपाणकर राजघराण्याचे पीर पंजे व ताबूत गावातील प्रमुख शहरातील
प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये श्रीमंत दादाराजे देसाई सरकार,शिवाजी भोई, गजानन भोई, शिवम भोई, पृथ्वी भोई, पांडू भोई यांच्यासह मानकर यांनी सहभाग घेतला होता.
सायंकाळी निपाणकर राजवाड्यामध्ये गावातील पीर पंजे ताबूत घेऊन प्रार्थना केल्यानंतर पंजे विसर्जनाचा कार्यक्रम झाला. यावेळी समीर सनदी, इकबाल सनदी, इकबाल तोरगल, अल्ताफ बाडीवाले, निसार मुजावर, जहीर मुजावर, वासिम मुजावर, यासीन हवालदार यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *