Sunday , August 23 2026
Breaking News

डॉक्टर दिनानिमित्त डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे सत्कार

Spread the love

 

बेळगाव : डॉक्टर दिनानिमित्त बेळगावातील बापट गल्ली परिसरातील सर्वपरिचित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. रायकर यांनी अनेक वर्षांपासून दिलेल्या समर्पित वैद्यकीय सेवेचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांना दिलेल्या निस्वार्थ वैद्यकीय सेवेची आवर्जून आठवण करून देण्यात आली. गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ते खऱ्या अर्थाने देवमाणूस म्हणून ओळखले जातात. उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि सेवाभावी वृत्ती असलेले डॉक्टर आपल्या बापट गल्लीत सेवा देत आहेत, याचा आम्हा सर्व नागरिकांना अभिमान असल्याचे मंडळाच्या वतीने महेश पावले यांनी उपस्थितांसमोर सांगितले.

या सत्कारप्रसंगी श्री कालिकादेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते सुनील केसरकर, अंकुश केसरकर, अभी निलजकर, भाऊ किल्लेकर, अतुल केसरकर, महेश पावले, धनंजय कणबरकर तसेच परिसरातील अनेक नागरिक व रुग्ण उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *