Sunday , August 23 2026
Breaking News

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत , देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला तर सत मीरा व शातीनिकेतन शाळेने विजेतेपद पटकाविले.

14 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूरचा 18- 15 असा पराभव केला, तर मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 17- 14 अशा गुण फरकाने पराभव केला, माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जीनगौडा शाळेने स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचा 16- 14 अशा गुण फरकाने पराभव केला, तर मुलींच्या गटातीत अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 22- 14 असा पराभव केला व या स्पर्धेचे विजेतेपद पटकावविले.
शाळेच्या माधव सभागृहात या स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी सुधीर गाडगीळ कृष्णा भट्ट, अशोक शिंत्रे, विद्याभारती जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, हरीश सोनार, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, शिवकुमार सुतार, सागर कोलेकर, श्रीकांत कांबळे, मंजुळा, गंगा गाणीकोप्प या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *