
बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक विभागाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी दुरुस्ती व अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची नोंद मतदार यादीत अचूक आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या पात्र नागरिकांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, त्यांनी आवश्यक अर्ज भरून तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी आवाहनात नमूद केले आहे. तसेच २००२ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांनी आपली माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करून आवश्यक फॉर्म वेळेत भरावेत, जेणेकरून मतदार यादी अद्ययावत आणि अचूक राहील.
मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने ही प्रक्रिया गांभीर्याने घेण्याचे आवाहनही कोंडुसकर यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta