Monday , September 21 2026
Breaking News

“SIR” संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या मराठा मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मराठी भाषिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. ही बैठक रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे होणार आहे.

सीमाभागात राबविण्यात येत असलेल्या SIR प्रक्रियेचे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध करून दिले जात असल्याने, ही प्रक्रिया मराठी भाषेतही राबविण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी शुक्रवारी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी असलेले महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेतली होती.

यावेळी समितीने, राष्ट्रीय पक्षांप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीलाही SIR प्रक्रियेची माहिती देण्यात यावी तसेच समितीच्या प्रभागनिहाय प्रतिनिधींना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर महानगरपालिका आयुक्तांनी, मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (BLA/पोलिंग एजंट) यांची यादी प्रशासनाकडे सादर केल्यास संबंधित प्रतिनिधींना प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल, अशी ग्वाही दिल्याचे समितीने सांगितले.

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील समिती कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (पोलिंग एजंट) म्हणून कार्य करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची आपल्या भागातील यादी सोबत आणण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, एम. जी. पाटील आणि अमर येळ्ळूरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *