Sunday , September 20 2026
Breaking News

सीमाभागात “SIR” फॉर्म मराठीत उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला म. ए. समितीचे स्मरणपत्र

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेसाठी गणना (Enumeration) फॉर्म मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, तसेच तोपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करत मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात १ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करत करण्यात आलेल्या स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे की, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण तसेच सीमाभागातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. असे असताना सध्या सुरू असलेल्या SIR पडताळणी प्रक्रियेसाठी फक्त कन्नड भाषेतील फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामुळे मराठी भाषिक मतदारांना फॉर्ममधील माहिती समजण्यास अडचणी येत असून, पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक भाषिक नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय फॉर्म मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना यापूर्वीही वेळोवेळी निर्देश देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच, भारत निवडणूक आयोगाने १६ सप्टेंबर २००८ रोजीच्या आदेशानुसार कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात मतदार याद्या व निवडणूक संबंधित सर्व साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचेही स्मरणपत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

मात्र, SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध न करून दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध करून द्यावेत, तसेच ते उपलब्ध होईपर्यंत पडताळणी प्रक्रियेची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी देखील पत्रात करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *