Sunday , September 20 2026
Breaking News

कारागृहात असलेल्या पतीचे आधार कार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ; मुलीच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा

Spread the love

 

बेळगाव : आंतरजातीय विवाह करून संसार थाटलेल्या एका महिलेवर आज मुलीच्या शिक्षणासाठी आणि आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. सध्या तिचा पती हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, त्याचे आधार कार्ड मिळवण्यासाठी ती गदगहून बेळगावपर्यंत वारंवार ये-जा करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम समाजातील या महिलेने समाजाच्या विरोधाला न जुमानता हिंदू तरुणाशी विवाह केला होता. त्यांना दोन मुली झाल्या. मात्र मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने मोठ्या मुलीची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा झाली असून तो सध्या हिंडलगा कारागृहात आहे.

दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेसाठी पतीच्या आधार कार्डाची आवश्यकता आहे. मात्र संबंधित कागदपत्र मिळवण्यासाठी महिला गदगहून बेळगावला येत असूनही तिला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

या महिलेची मागणी पतीची सुटका करण्याची नसून, केवळ त्याचे आधार कार्ड उपलब्ध करून देण्याची आहे, जेणेकरून मुलीचे शिक्षण आणि आवश्यक सरकारी प्रक्रिया पूर्ण करता येतील. संबंधित अधिकाऱ्यांनी मानवी दृष्टिकोनातून या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *