Monday , September 21 2026
Breaking News

कणबर्गी शासकीय हायस्कूलमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन जनजागृती सत्र

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लबच्या वतीने कणबर्गी येथील शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) विषयावरील जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ११० विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

सत्रामध्ये मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छता, संतुलित आहार, वैयक्तिक आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींमधील गैरसमज दूर करून मासिक पाळीकडे सकारात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश देण्यात आला.

रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, ‘गुड टच-बॅड टच’ची जाणीव आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संयोजन रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी आणि डॉ. स्मिता गुडगनट्टी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रण देणाऱ्या एकत्र फाउंडेशनच्या अध्यक्षा रोटेरियन पुष्पा पर्वतराव यांचे रोटरी क्लबतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सचिव रोटेरियन ज्योती यांच्या सहकार्याने हा जनजागृती उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *