Sunday , September 20 2026
Breaking News

जनतेच्या प्रश्नांसाठी सरकार थेट जिल्ह्यात : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love

 

मंत्री, आमदारांसह जिल्ह्यातील विकासकामे व नागरिकांच्या समस्यांचा सखोल आढावा; तातडीच्या निर्णयांचे संकेत

बेळगाव : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन स्थानिक प्रश्नांना तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जिल्हा दौऱ्यांतर्गत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गुरुवारी बेळगावात दाखल झाले. जिल्ह्यातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावात आगमनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे, स्थानिक अडचणी समजून घेणे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. या दौऱ्याची सुरुवात बसवकल्याण येथून झाली असून, त्यानंतर बिदर आणि कलबुर्गी मार्गे ते बेळगावात पोहोचले आहेत.

यावेळी राज्य सरकारमधील संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असून, जिल्ह्यातील आमदारांकडून नागरिकांच्या मागण्या, पायाभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या विषयांवर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.

राज्य सरकार नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या सोडविण्यास कटिबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार विकासाला गती देणे, प्रशासन अधिक प्रभावी करणे आणि लोकाभिमुख निर्णय घेणे, हा या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *