Sunday , September 20 2026
Breaking News

शहापूरमधील सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत कोसळली

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शाहापूर परिसरातील ऐतिहासिक सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी घडली.

शहापूर नाथ पै सर्कलजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षण भिंत सततच्या मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. अखंड पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

भिंत कोसळताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, घटना घडली त्या वेळी रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, भिंत कोसळल्यामुळे सिद्धार्थ बोर्डिंगच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसराची पाहणी करण्यात येत असून, सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी जीर्ण इमारती आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *