Monday , September 21 2026
Breaking News

दिव्यांग संस्थेत कोट्यवधींच्या जमिनीच्या व्यवहाराचा स्फोट!

Spread the love

 

खोटी कागदपत्रे, बनावट सह्या; अध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

बेळगाव : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या शहापूर येथील असोसिएशन ऑफ फिजिकली हॅंडीकॅप्ड या संस्थेत कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारावरून गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला असून, खोटी कागदपत्रे तयार करणे, बनावट सह्या करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदारांसह सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे सदस्य सचिन रामचंद्र पाटील (रा. आदर्शनगर, वडगाव) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात अध्यक्ष वामन कट्टी, सचिव गिरीश सव्वाशेरी, संयुक्त सचिव वीणा स्वामी, खजिनदार दयानंद दड्डीकर, तसेच सदस्य राघवेंद्र अनवेकर, अरिफ अली वालीकार आणि तस्मिनजा डोणकरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

फिर्यादीनुसार, २९ जून २०२३ रोजी कथित सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नियमांमध्ये बेकायदेशीर दुरुस्ती करून कुट्टलवाडी येथील ६ एकर २८ गुंठे जमीन यशनिल डेव्हलपर्स यांना विकसित करण्यासाठी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी आवश्यक असलेली विशेष सर्वसाधारण सभा कायदेशीर पद्धतीने झालेली नव्हती. तरीही खोटी कागदपत्रे तयार करून ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याचबरोबर, सभेतील ११ सदस्यांपैकी सचिन पाटील, सुधीर शेरेकर, राजेशकुमार गिरी आणि विजय पायस या चौघांना सदस्यत्वावरून कमी केल्याचे खोटे दाखविण्यात आले. ८ जून २०२३ रोजी त्यांना नोटीस बजावल्याचे भासवून त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या आणि २९ जूनच्या सभेला ते उपस्थित होते, अशी खोटी नोंद करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत नमूद आहे.

या गंभीर प्रकरणी २६ जून रोजी सातही पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *