Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालये रविवारीही सुरू; १२ जुलैला मिळणार नोंदणी सेवा

Spread the love

 

 

बेळगाव : मालमत्ता नोंदणीसह इतर नोंदणीसंबंधित कामांसाठी नागरिकांना दिलासा देत कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये नियमितपणे सुरू राहणार असून सर्व नोंदणी सेवा उपलब्ध राहतील.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील तरतुदींनुसार या रविवारीची सार्वजनिक सुटी रद्द करून तो दिवस ‘कामाचा दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीची नोंदणी, मुद्रांक शुल्क भरणे तसेच नोंदणी विभागाशी संबंधित इतर प्रलंबित कामे नागरिकांना रविवारीही करता येणार आहेत. आठवड्याच्या इतर दिवशी वेळ काढणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी हा निर्णय विशेषतः लाभदायक ठरणार आहे.
महसूल विभागाने नागरिकांना या विशेष सुविधेचा लाभ घेऊन प्रलंबित नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. १२ जुलै रोजी सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये नियमित कामकाजाच्या वेळेत सेवा उपलब्ध राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *