Monday , September 21 2026
Breaking News

आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला बेळगावात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तीन दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला शुक्रवारी बेळगावातील अनगोळ येथील संत मीरा शाळेत प्रारंभ झाला. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे उद्घाटन झाले.

या बैठकीला सर्व सहसरकार्यवाह, विविध कार्यविभागांचे अखिल भारतीय प्रमुख, कार्यकारिणी सदस्य, क्षेत्रीय प्रचारक, सह क्षेत्रीय प्रचारक तसेच देशातील ४६ प्रांतांचे प्रांत प्रचारक व सह प्रांत प्रचारक उपस्थित आहेत. संघ प्रेरित विविध संस्थांचे अखिल भारतीय संघटन मंत्रीही बैठकीत सहभागी झाले आहेत.

बैठकीत २०२६ नंतर विविध स्तरांवर आयोजित करण्यात आलेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. शाखास्तरावरील कार्यविस्तार, संघ शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल तसेच पुढील शाखा विस्ताराच्या योजनांवर सविस्तर चर्चा झाली.

याशिवाय, संघ शताब्दी वर्षातील उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या २०२६-२७ च्या देशव्यापी दौऱ्याचे नियोजन आणि आगामी संघटनात्मक उपक्रमांवरही विचारमंथन करण्यात आले.

संघाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संघ शताब्दी वर्षाचे उर्वरित कार्यक्रम २० ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या विजयादशमी उत्सवापर्यंत सुरू राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *