Sunday , July 26 2026
Breaking News

एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर ‘एसआयआर’ निरीक्षकपदाची जबाबदारी

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे पक्षाने आणखी एक महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी त्यांची राज्यातील ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

एआयसीसीच्या वतीने गोवा आणि इतर राज्यांच्या प्रभारी म्हणून प्रभावीपणे काम केलेल्या डॉ. निंबाळकर यांच्याकडे आता कित्तूर कर्नाटक विभागाचा प्रभार देण्यात आला आहे. या अंतर्गत त्यांना बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, चिक्कोडी, बागलकोट, विजयपूर, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. निंबाळकर या संबंधित जिल्ह्यांचा दौरा करून पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘एसआयआर’ प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात आहे की नाही, याची पाहणी करणार आहेत. तसेच स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधून आवश्यक मार्गदर्शन करतील आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल केपीसीसीकडे सादर करतील.

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या संघटन कौशल्याचा आणि अनुभवाचा लाभ कित्तूर कर्नाटक विभागातील काँग्रेस संघटनेला होईल, तसेच ‘एसआयआर’ प्रक्रियेला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *