

बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने मंगळूर येथील यमिकेरे जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली.
स्पर्धेत दिशा होंडी (जेएसडब्ल्यू अकादमी) हिने 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 28.74 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक, 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 1:02.56 सेकंदांसह रौप्यपदक, तर 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1:08.51 सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदक पटकावले.
निधी मुचंडी हिने 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 1:08.90 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक, तर अर्णव किल्लेकर याने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 2:27.38 सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदक मिळवत बेळगावचा गौरव वाढविला.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर दिशा होंडी हिची पुढील महिन्यात जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्पर्धेतील सर्व यशस्वी जलतरणपटू हे आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे सदस्य असून त्यांना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलभत्ते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर आणि नगरसेवक नितीन जाधव यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभत असल्याचे क्लबतर्फे सांगण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta