Sunday , September 20 2026
Breaking News

खो-खो स्पर्धेत देवेंद्र जीनगौडा शाळेला विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : गणेशपुर हिडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत विविध गटात देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळीने चारी गटाचे विजेतेपद पटकाविले

प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपात्य सामन्यात संत मीरा गणेशपुर शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा 3 गुणानी पराभव केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात देवेंद्र जीनगौडा शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 6 गुणांनी पराभव केला अंतिम लढतीत देवेंद्र जीनगौडा शाळेने संत मीरा गणेशपुर शाळेचा 7 गड्यानी पराभव करित विजेतेपद पटकाविले.

मुलींच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जीनगौडा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूरचा 11 गुणांनी परभाव केला,

माध्यमिक मुलांच्या गटातील उपात्य लढतीत संत मीरा गणेशपुर शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा 7 गुणानी पराभव केला.
दुसऱ्या उपात्य सामन्यात देवेंद्र जीनगौडा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 7 गुणानी पराभव केला, तर अंतिम लढतीलत देवेंद्र जीनगौडा शाळेने संत मीरा गणेशपुर शाळेचा 7 गुणानी पराभव केला
तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जीनगौडा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 11 गुण फरकाने पराभव केला
स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा इंग्रजी शाळा गणेशपुर हिंडलगा शाळेचे शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गानीकोप्प, सागर कोलेकर, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी स्वाती सावंत, शिवकुमार, पोर्णिमा बाळेकाई, सुजित नेरुलकर, सुरज देसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *