Monday , September 21 2026
Breaking News

खडेबाजारातील उघडा खड्डा ठरत आहे जीवघेणा; विजेच्या उघड्या केबलमुळे महिलेस शॉक, नागरिकांमध्ये संताप

Spread the love

 

बेळगाव : खडेबाजार येथील मोनप्पा पान शॉपसमोर खोदलेला खड्डा आणि त्यामध्ये उघड्यावर पडलेल्या विद्युत केबलमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी एका महिलेला विजेचा शॉक बसल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक परिस्थितीबाबत तक्रार केल्यानंतर हेस्कॉमकडून हे काम एल अँड टी (L&T) कंपनीने केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, या कामाची जबाबदारी कोणाची याबाबत परस्परांवर दोषारोप होत असल्याने हा धोकादायक खड्डा अद्यापही तसाच उघडा पडला आहे.

दररोज या मार्गावरून मोठ्या संख्येने पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांची ये-जा होत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करून तातडीने उघड्या केबल सुरक्षित कराव्यात, खड्डा बुजवावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *