Sunday , September 20 2026
Breaking News

चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी खानापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्ड ची मागणी केली होती. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व चन्नेवाडीचे रहिवाशी धनंजय पाटील यांनी बेळगावचे माननीय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी निवेदन सादर केले. या निवेदनासोबत खानापूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची व सह्यांचीही प्रत सोबत जोडली.

जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देतांना धनंजय पाटील यांनी गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी ग्रामपंचायत ते लोकसभा पर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या चन्नेवाडी येथील प्राथमिक शाळेत चन्नेवाडी व भुत्तेवाडी गावातील मतदारांसाठी मतदाना करण्यासाठी बूथ असायचा, पण कालांतराने मतदारांच्या संख्येनुसार भुत्तेवाडी गावच्या नागरिकांनी आपली मतदार संख्या जास्त असल्याची असल्याची तक्रार केल्याने हा बूथ भुत्तेवाडी येथील प्राथमिक शाळेत हलविण्यात आला.

भुत्तेवाडी येथे असलेल्या बुथला आमचा कुठलाही आक्षेप नाही परंतु चन्नेवाडी येथील मतदारांना हे सोयीस्कर नसून गैरसोय होत आहे, त्यामुळे वयोवृद्ध,दिव्यांग किंवा इतर शारीरिक कारणामुळे मतदानापासून वंचित व्हावे लागत आहे. त्यासाठी चन्नेवाडी गावासाठी गावच्या प्राथमिक शाळेत स्वतंत्र बूथची मागणी केली.

त्याच बरोबर कसबा नंदगड ग्रामपंचायती मध्ये भुत्तेवाडी व चन्नेवाडी गावचे मिळून एकच वॉर्ड आहे व वॉर्डमध्ये तीन ग्रामपंचायत सदस्य अस्तित्वात आहेत, भुत्तेवाडी गावची मतदारसंख्या ही चन्नेवाडी गावच्या मतदार संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहे त्यामुळे ग्रामपंचायतीत चन्नेवाडी गावाला लोकप्रतिनिधींत्व मिळणे कठीण आहे आणि त्यामुळे गावचा विकास साधने शक्य नाही व नागरिकांसाठी गैरसोयीचे होत आहे. त्यासाठी चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र वॉर्ड करून द्यावा. अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले तर स्वतंत्र वॉर्डासाठी मतदारांची संख्या व इतर माहिती घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी दिले.

या निवेदनावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे संपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *