Sunday , September 20 2026
Breaking News

सोशल मीडियावरून मोर्चा-आंदोलनाचे आवाहन करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा; पूर्वपरवानगी अनिवार्य

Spread the love

 

बेळगाव : सोशल मीडियावरून मोर्चा, आंदोलन, निदर्शने किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यापूर्वी बेळगाव शहर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय अशा प्रकारचे आवाहन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
पोलीस आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात अलीकडच्या काळात सोशल मीडियावरून अचानक नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा आयोजित करण्यापूर्वी संबंधित आयोजकांनी पोलीस विभागाची आवश्यक परवानगी घेणे अनिवार्य आहे. परवानगी मिळाल्यानंतरच सोशल मीडियावरून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
परवानगीशिवाय सोशल मीडियावरून नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे आढळल्यास संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल. तसेच अशा आवाहनामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आयोजकावर राहील, असेही आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी बेळगाव शहर पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *