Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीराम कॉलनीत वेश्याव्यवसायावर एपीएमसी पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा, महिलेची सुटका

Spread the love

 

बेळगाव : शहरातील श्रीराम कॉलनी, न्यू वैभव नगर परिसरातील एका भाड्याच्या घरावर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेला कथित वेश्याव्यवसाय उधळून लावला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल रामू बडकंबी (रा. अथणी) आणि शबाना अब्दुल रहमान किल्लेदार (रा. अमन नगर) यांनी भाड्याने घेतलेल्या घरात एका महिलेला ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्राहकांकडून पैसे घेऊन हा व्यवसाय चालविला जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

माहितीची खातरजमा करून एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान एका महिलेची सुटका करण्यात आली, तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *