Sunday , August 16 2026
Breaking News

रौडींविरोधात पोलिसांची धडक मोहीम; पाच जिल्ह्यांत १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Spread the love

 

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील रौडींच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांत रौडींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ५३ विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती.

या मोहिमेदरम्यान बीएनएसएसच्या कलम १२६, १२७, १२८ आणि १२९ अंतर्गत एकूण १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विजयपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७० जणांचा समावेश आहे. बेळगावमध्ये ३२, बागलकोटमध्ये २०, धारवाडमध्ये २ आणि गदगमध्ये २४ जणांवर कारवाई करण्यात आली.

२३ रौडींना हद्दपार करण्याचे आदेश

गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या रौडींवर कर्नाटक पोलीस कायद्यानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पाच जिल्ह्यांतील २३ रौडींविरोधात हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये विजयपूरमधील एक, बागलकोटमधील १०, धारवाडमधील दोन आणि गदगमधील १० जणांचा समावेश आहे.

सहा जणांवर गुंडा कायदा

गंभीर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सहा जणांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांवर ही कारवाई झाली.

दरम्यान, संघटित गुन्हेगारीविरोधातही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणात पाच आरोपींवर ‘कोका’ कायदा लागू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रौडींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *