
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत शॉपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गारमेंटस, ज्वेलरी, टुरीझम आदी प्रदर्शनांचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे शुक्रवार दि. १४ ते मंगळवार दि. १८ ऑगस्ट दरम्यान ५ दिवस आयोजित केले आहे. एकाच छताखाली 85 स्टॉलमधून सुमारे १० हजार वस्तू मांडण्यात येणार आहेत.
सदर प्रदर्शनातील ईव्ही ऑटो एक्स्पो विभागात, यश ऑटो अँपरी, नागशांती विदा, बेळगाव हब रिवोल्ट मोटारसायकल, मिशा बजाज चेतक, ई बाईक, बी एम मोटर्सतर्फे बीगाॕस, एमजी इ कार, बेल्लद एंटरप्राईस अथर इ बाईक व माणिकबाग ऑटोमोबाईलतर्फे सुझुकी दुचाकी आदींचा समावेश आहे.
शॉपिंग उत्सव विभागात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहलींचे गगन टूर्स, प्रवीण हाॅलीडेज, आरीया टूर्स व ट्राव्हेल्सतर्फे मार्गदर्शन, उषा शिलाई मशीन, टाटा रुफटाॅप सोलार, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटरची आटा चक्की व गुळाचा चहा-कॉफी पावडर, ब्लीस फर्निशिंग, कॉटन बेडशीट पिलो कव्हर, खादी शर्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलकल कॉटन साडी, घागरा चोली, मैसूर आयुर्वेदिक केसांचे तेल, कोरियन वेस्टर्न ड्रेस, काश्मिरी शाल, साडी, ड्रेस मटेरियल, वेस्टर्न टाॕप्स, जयपुरी कुर्ता पायजमा, आयुर्वेदिक औषधे, पतियाला सूट, विविध प्रकारचे पापड व रागी पापड, युरेका फोर्बस होम क्लिनर व वॉटर प्युरिफायर, इमिटेशन फॅन्सी ज्वेलरी, घरगुती उपयोगी उपकरणे, मुखवास, लोणची, खादी शर्ट, कुर्ता पायजमा, पेस्ट कंट्रोल, टीव्ही-फ्रीज कव्हर, लेडीज टॉप्स, अर्बन ट्राईबस मेडी टनेक्ट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उत्पादने, फॅन्सी चप्पल व शूज, ओरिफ्लेम उत्पादने, राजस्थानी लोणची, सुती बेडशीट व पिलो, लहान मुलांची खेळणी, लोककल्प फौंडेशनची विविध उत्पादने, सायकल अगरबत्ती, मुंबईची नक्षत्र आर्ट ज्वेलरी, वर्धमान ज्वेलर्सची चांदीचे दागिने, अरिहंत बिस्किटे, राम बंधू मसाले, गोबी मंच्युरियन मसाले, आयुर्वेदिक जडी बुटी, हॅप्पी थाॅटसची मार्गदर्शन पुस्तके, फाॅरचुन हेल्थ फिटनेसस उत्पादने, हैद्राबादी बँगल्स, नाईट पायजमा, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅन्सी चप्पल, पेस्ट कंट्रोल, लखनवी कुर्त, लेडीज वेस्टर्न टाॅप्स, आदी. फर्निचर विभागात वुडन झुला व सोफा, क्लासिक फर्निटो पार्कतर्फे सोफा कम बेड, मॅटेस, कर्टन्स, कार्विंग फर्निचर, यश किचन्स, स्काय वर्ल्ड एव्हिएशनचा विमान चालन अभ्यासक्रम, मिर्झापूर काश्मीरी कार्पेट्स, ब्रास झुला आदी. विमा व गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स व सचिन स्मार्ट इनव्हेस्टमेंट सल्लागार यामध्ये सहभागी आहेत.
खवय्यांसाठी पानी पुरी, भेल पुरी, शेव पुरी, विजापूर गिरमीट, स्प्रिंग पोटॅटो, स्वीट कॉर्न, माॅकटेल्स, चहा, काॕफी आदी उपलब्ध आहे. प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta