Monday , September 7 2026
Breaking News

भुवनेश्वर येथे ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी

Spread the love

 

१५ वर्षांखालील वयोगटात पटकावले सुवर्णपदक; बसरीकट्टी गावच्या सुपुत्राचा गौरव

उचगाव : ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत बसरीकट्टी(ता. बेळगाव) गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी याने उल्लेखनीय कामगिरी करत १५ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे बसरीकट्टी (बेळगाव) गावासह आजरा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रज्वल हा बसरीकट्टी गावचे सुपुत्र तथा इंडियन आर्मीतील हवालदार लक्ष्मण अनंत हिरोजी यांचे चिरंजीव आहेत. त्याने अत्यंत मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. विविध भागांतून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रज्वलने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रज्वल हा दि डायनॅमिक पब्लिक स्कूल, सुळेरान, ता. आजरा (महाराष्ट्र) येथे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या क्रीडा कारकिर्दीला निश्चितच नवी दिशा मिळाली आहे.

प्रज्वलच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक दिनेश जाधव सर आणि . सी. एन. खिल्लारे सर, मुख्याध्यापक संतोष पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय दाभोळे, सचिव चैतन्य दाभोळे, कार्यकारी संचालक अमित पाटील तसेच आजोबा कंत्राटदार अनंत हिरोजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्वलच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कष्ट, योग्य प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, याचे प्रज्वल हिरोजीचे यश हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
भविष्यातही त्याने क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा त्याला देण्यात येत आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *