Monday , September 7 2026
Breaking News

भवानीनगरात चोरट्यांचा तासभर मुक्त संचार; सीसीटीव्ही फुटेजमुळे नागरिकांमध्ये भीती

Spread the love

 

 

बेळगाव : शहर व उपनगरात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून भवानीनगर परिसरात चोरट्यांनी तब्बल तासभर मुक्तपणे वावर केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री पाच जणांच्या टोळीने नित्यानंद कॉलनी, भवानीनगर परिसरात फिरून बंद घरांची पाहणी केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पाच जणांची टोळी नित्यानंद कॉलनी आणि भवानीनगर परिसरात दाखल झाली. चोरटे अत्यंत निर्भयपणे परिसरातील विविध इमारती आणि घरांभोवती फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जवळपास तासभर त्यांचा परिसरात वावर होता. बंद घरे हेरून चोरीसाठी संधी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे फुटेजवरून दिसून येते.

दरम्यान, भवानीनगर येथील भवानी मंदिराजवळील एका घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नित्यानंद कॉलनीतील एका घरासमोरही चोरटे चोरीच्या उद्देशाने पोहोचले होते. मात्र, घराबाहेरील सेन्सरमुळे अचानक दिवे लागल्याने चोरटे घाबरून तेथून पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

एकाच परिसरात चोरट्यांची टोळी तब्बल तासभर फिरत असताना नागरिकांना याची कल्पना नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा प्रकारे चोरट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर सीसीटीव्ही, सेन्सर दिवे आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत डॉ. सोनाली सरनोबत यांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love  बळ्ळारी : कर्नाटक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत भाजप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *