Saturday , August 29 2026
Breaking News

बेळगावसह खानापूर तालुक्यात उद्या ‘पॉवर कट’!

Spread the love

 

हेस्कॉमच्या दुरुस्ती कामाचा फटका; बेळगावसह खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प

बेळगाव : हेस्कॉमच्या दुरुस्ती कामामुळे मागील आठवड्यात बेळगाव शहर अंधारात गेले होते. आता दुरुस्तीच्या कामांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळला असून, रविवारी (३० ऑगस्ट) बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा तब्बल सात ते आठ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेस्कॉमच्या वतीने विद्युत वाहिन्या व संबंधित यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धामणे, कुरबुरहट्टी, मासगोहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळूर, सुळगा (राजहंसगड), देसूर, नंदीहळी, कोंडस्कोप, हालगा आणि बस्तवाड या गावांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. यासोबतच संबंधित गावांतील शेतीपंपसेटचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

दरम्यान, सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुतनाळ, वीरनकोप्प, आरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगिरी, गजपती, अंकलगी, हुलकवी, के. के. कोप, कलारकोप, सिद्धनहळ्ळी, बेडकोळमठ, हलगीमरडी, नागेनट्टी, नागेरहाळ, बडस, नंदीहळी आणि कुकडोळे या गावांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प आणि परीशवाड या गावांमध्येही सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. या गावांमधील शेतीपंपसेटलाही वीजपुरवठा उपलब्ध होणार नाही.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे व सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिकांनी वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी आवश्यक ती विद्युत उपकरणे बंद ठेवावीत आणि पाण्याचा साठा व इतर आवश्यक कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१व्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य शालेय जलतरण स्पर्धांना आजपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मराठा युवक संघ आणि आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *