Saturday , August 29 2026
Breaking News

बेळगावने देशाला तीन ऑलिम्पिक हॉकीपटू दिले : ब्रिगेडियर गिरीश उपाध्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगावने देशाला तीन ऑलम्पिक हॉकीपटू दिले आहेत मराठा सेंटरने सुद्धा हॉकीला खूप महत्त्व दिलेले आहे हॉकी हा खेळ क्रीडापटूंना सदृढ ठेवतो पुढील ऑलिंपिक स्पर्धेसाठी आतापासूनच हॉकीपटुनी जय्यत तयारी करावी आजच्या हॉकी स्पर्धा पाहून माझे मन भरून आले असे मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्या बोलताना म्हणाले. ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित आंतरविद्यालय व आंतरशालेय हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमनी होते.

हॉकी स्पर्धां बक्षीस वितरण समारंभ व्यासपीठावर मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्या, वेदांत सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सायनेकर, जिल्हा युवजन खात्याचे बी श्रीनिवास, उपाध्यक्ष पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, सचिव सुधाकर चाळके, मनोहर पाटील, नामदेव सावंत, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, कपिल भोसले, गोपाळ खांडे, संपत पाटील, संदीप पाटील, सुरेश पोटे, स्वानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, शांताप्पा नरगोडी, डॉ. गिरीश माने, प्रशांत मंकाळे, चेतन दोडमणी, डिपार्टमेंट ऑफ युथ एम्पॉरमेंट व स्पोर्ट्स खात्यातर्फे बसवराज जकन्नावर, जयवंत खन्नूकर, कृष्णा सायनेकर, प्रकाश चाळके, दत्तात्रय जाधव, डाॅ. रामकृष्ण एन,, आनंद रत्नपगोळ, विकास कलगटगी, विनोद पाटील, आनंद आपटेकर तसेच सविता सायनेकर, अश्विनी केसरकर, इशा चव्हाण, आशा होसमनी, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, अश्विनी बस्तवाडकर, अश्विनी पाटील व अश्विनी डुकरे आदी उपस्थित होते.

हाॕकी स्पर्धेचा अंतिम निकाल
आंतरशालेय अंतिम स्पर्धेत ताराराणी हायस्कूलने भंडारी हायस्कूल विरुद्ध 4-1 ने विजय प्राप्त केला. तर आंतर महाविद्यालयीन मुलींच्या गटातून मुडलगी बीपीएड कॉलेजने आरपीडी महाविद्यालयावर सडन डेटवर विजय प्राप्त केला,
आंतर महाविद्यालयीन मुलांच्या गटातून व्हिटीयु महाविद्यालयाने आरपीडी महाविद्यालयावर 3-1ने विजय प्राप्त केला यांनी विजय प्राप्त केला.

About Belgaum Varta

Check Also

प्रकाश निकम बेळगावचे नवे पोलीस आयुक्त; भूषण बोरसे यांची धारवाडला बदली

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची बदली करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *