Saturday , August 29 2026
Breaking News

प्रकाश निकम बेळगावचे नवे पोलीस आयुक्त; भूषण बोरसे यांची धारवाडला बदली

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाचे उपसचिव संजय बी. एस. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २००९ च्या तुकडीतील डीआयजी दर्जाचे अधिकारी भूषण बोरसे यांच्याकडे हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी तात्काळ सोपविण्यात आली आहे. तर हुबळी-धारवाडचे विद्यमान पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगावमधील कार्यकाळात भूषण बोरसे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच भाषिक, जातीय आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या बेळगावमध्ये विविध प्रसंगी परिस्थिती हाताळताना त्यांनी संयम आणि प्रभावी पोलिसिंगचा परिचय दिला.

त्यांच्या कार्यपद्धतीमुळे बेळगाव शहरातील नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे बोरसे यांची अचानक झालेली बदली चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या बदलीमागील कारणांबाबत प्रशासकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

आता त्यांच्या जागी २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पोलीस आयुक्तांसमोर शहरातील कायदा व सुव्यवस्था, आगामी सण-उत्सव तसेच नागरिकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावने देशाला तीन ऑलिम्पिक हॉकीपटू दिले : ब्रिगेडियर गिरीश उपाध्या

Spread the love  बेळगाव : बेळगावने देशाला तीन ऑलम्पिक हॉकीपटू दिले आहेत मराठा सेंटरने सुद्धा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *