Saturday , August 29 2026
Breaking News

श्रावण मासानिमित्त शिवबसव नगरमधील जोतिबा मंदिरात ३० ऑगस्ट रोजी केदार विश्वशांती यज्ञ

Spread the love

 

बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात श्रावण मासानिमित्त मंदिर व्यवस्थापन कमिटीच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

यज्ञाच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता श्री नाथांचा रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यवाचन, गणपती पूजन, शक्तिपीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्रपीठ पूजन, सत्यनारायण पूजन तसेच होम-हवन आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत.

या विश्वशांती यज्ञात सर्व भाविकांनी सहभागी होऊन यज्ञामध्ये आहुती देऊन देवदर्शन, आशीर्वाद व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या वाटपाचा फेरआढावा घ्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love    बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *