Saturday , August 29 2026
Breaking News

खानापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सोमवारी सर्वपक्षीय बैठक; आमदार हलगेकरांचा पुढाकार

Spread the love

 

 

खानापूर : खानापूर तालुक्यासह शहरातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांना गती देण्यासाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या बैठकीचे आयोजन खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित चर्चा करावी आणि ठोस उपाययोजना निश्चित कराव्यात, या उद्देशाने ही बैठक घेण्यात येत आहे.

विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहून आपल्या भागातील समस्या, विकासाच्या गरजा तसेच त्यावरील सूचना मांडाव्यात, असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले आहे.
बैठकीत तालुक्यातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे, शहरातील नागरी प्रश्न तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेतून प्राधान्यक्रम निश्चित करून संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाविरोधात खानापुरात विराट मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

Spread the love  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील रहिवासी मोहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *