Saturday , August 29 2026
Breaking News

वैद्य रुपेश साळुंखे यांना ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

 

बेळगाव : आयुर्वेदाच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून अविरत रुग्णसेवा, आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार आणि समाजसेवेचे कार्य करणारे वैद्य रुपेश साळुंखे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेच्या ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. बंगळूरु येथे २३ ऑगस्ट रोजी झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सिग्नेचर मीडिया हाऊस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पद्मश्री डॉ. कामिनी राव, प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश नवसोंदी तसेच कर्नाटक होमिओपॅथी बोर्डचे अध्यक्ष डॉ. रुद्रेश यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्य रुपेश साळुंखे हे बेळगावातील सोमवार पेठ, टिळकवाडी येथील अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदाच्या शास्त्रशुद्ध उपचारपद्धतीला आधुनिक दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी हजारो रुग्णांना उपचार व मार्गदर्शन दिले आहे. गेल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ आयुर्वेदसेवेचा आणि समाजोपयोगी कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.

कॅन्सर, संधिवात, मणक्याचे विकार, मेंदूशी संबंधित आजार, त्वचारोग तसेच पचनसंस्थेच्या विविध तक्रारींवरील उपचारांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. पंचकर्मासोबत मेडिकल योग थेरपीचा समन्वय हे त्यांच्या चिकित्सापद्धतीचे वैशिष्ट्य ठरले आहे.

वैद्य साळुंखे यांच्या कार्याची यापूर्वीही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी दखल घेतली आहे. त्यांना धन्वंतरी पुरस्कार, ‘द प्राइड ऑफ महाराष्ट्र’, आयुर्वेद भास्कर पुरस्कार, बेस्ट फिजिशियन ऑफ आयुर्वेद, नॅशनल अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर हेल्थ एक्सलन्स इंडिया तसेच प्रेरणामूर्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बेळगावकरांच्या विश्वासाची पावती

‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न’ पुरस्कार हा वैद्य साळुंखे यांच्या वैद्यकीय कार्याचा सन्मान तर आहेच; मात्र त्याचबरोबर बेळगावकरांनी गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीवर दाखविलेल्या विश्वासाचीही ही पावती आहे. रुग्णसेवेला केंद्रस्थानी ठेवून आयुर्वेदाचा व्यापक प्रसार करण्याच्या त्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.

या यशामागे त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. संध्या नेरलेकर यांचेही मोलाचे सहकार्य आणि योगदान असल्याचे सांगण्यात आले. वैद्य रुपेश साळुंखे यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आयुर्वेदसेवेच्या पुढील प्रवासासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या वाटपाचा फेरआढावा घ्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love    बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *