

बेळगाव : भारताचे महान हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आणि मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहिती विक्रांत गुरव (इयत्ता पाचवी) याने सांगितली. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील उत्कृष्ट खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.
हाॅकीपट्टू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेकडून तालुका स्तरावर निवड झालेल्या खो-खो संघाचा, त्याचप्रमाणे एक्सलंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आणि बालकवी संमेलनात आपल्या कविता सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शाळेचा क्रीडामंत्री साईराज पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta