Sunday , August 30 2026
Breaking News

‘बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण

Spread the love

 

 

बेळगाव : चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बेळगावचा राजा’ नवसाला पावणाऱ्या गणरायाच्या आगमनाची तयारी मोठ्या दिमाखात सुरू असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी नव्या रूपात साकारण्यात आलेल्या भव्य रथाचे उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, विनायक पवार, प्रज्वल पाटील, कुशल पाटील आणि प्रीतम चौगुले, प्रशांत कुडे, उमेश मेणसे, सत्यम नाईक, निलेश गुंडकल यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पूजन करून उत्साहात अनावरण करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील आणि कुशाल रमेशराव पाटील या बंधूंनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च करून आकर्षक व भव्य रथ तयार करून दिला.त्यांच्या या योगदानाबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

रथाच्या अनावरण सोहळ्यावेळी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात तसेच मंगलमय वातावरणात रथाचे पूजन व अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास चव्हाट गल्लीतील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. बेळगावचा राजा’च्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली असून, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

देणगीदार प्रज्वल रमेशराव पाटील व कुशाल रमेशराव पाटील यांच्या या सामाजिक व धार्मिक योगदानाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

वैद्य रुपेश साळुंखे यांना ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love    बेळगाव : आयुर्वेदाच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून अविरत रुग्णसेवा, आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *