Sunday , September 20 2026
Breaking News

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू इंदूरला रवाना

Spread the love

 

 

विश्वास पवार यांची कर्नाटक संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

बेळगाव : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे दि. ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कनिष्ठ व उपकनिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी कर्नाटकचा संघ आज रवाना झाला. या संघाच्या प्रशिक्षकपदी एनआयएस कोच विश्वास पवार यांची निवड करण्यात आली आहे.

कर्नाटकच्या संघात बेळगावच्या राष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. युवराज मोहनगेकर हा १ मीटर व ३ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात सहभागी होणार आहे. अर्णव चिवटे १ मीटर व ३ मीटर स्प्रिंगबोर्ड, श्रेया जोगमनावर १ मीटर स्प्रिंगबोर्ड व ५ मीटर हायबोर्ड, तर तन्वी मुचंडी १ मीटर व ३ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

हे सर्व खेळाडू गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात नियमित सराव करीत आहेत. त्यांना डायव्हिंग प्रशिक्षक विश्वास पवार व भरत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शीतल हुलभते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर व नगरसेवक नितीन जाधव यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालेल्या सर्व खेळाडूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *