Sunday , September 20 2026
Breaking News

पंत जन्माष्टमी, गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : श्री पंत जन्माष्टमी, गोकुळाष्टमी उत्सव हा सोहळा श्री पंतवाडा समादेवी गल्ली येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.सकाळी सनई चौघडा वाद्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात ७ ते ८.३० पर्यंत पारंपरिक भजन, ९.१५ ते १० पर्यंत यमुनाका भजनी मंडळ यांचे भजन, सकाळी १० ते १०.३० पर्यंत सीमा कुलकर्णी यांचे गायन, सकाळी १०.३० ते ११.१५ पर्यंत योगेश रामदास यांचे भजन, सकाळी ११.१५ ते ११.३० पर्यंत श्री पंतचरित्रावर बोधपर व्याख्यान, दुपारी १२ वाजता श्रींची आरती झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला.त्यानंतर दुपारी २ ते ३ पर्यंत पारंपरिक भजनानंतर ३ वाजता श्री पंत महाराजांच्या घरांनातर्फे प. पू. संजीव पंत, प. पू. राजन पंत यांच्या हस्ते श्रींचा जन्मकाळ व पाळणा व आरती करण्यात आली. यावेळी श्री पंत मंडळाचे कार्यकर्त अनंत किल्लेकर डॉ.महेंद्र राणे, विवेक चिंचणेकर, समीर कागले, शंतनु सायनाकर, राजेश पावशे, यमुनाका भजनी मंडळाचे अध्यक्ष सुनंदा किल्लेकर व सर्व महिला मंडळ तसेच अनेक भक्तांच्या उपस्थितीत भजन गायन आरती असा कार्यक्रम पार पडला. सायंकाळच्या सत्रात टिपरी, तालनृत्य आणि सुंठवडा प्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *