Friday , November 6 2026
Breaking News

सौ. शोभा राजाराम निलजकर यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

Spread the love

 

येळ्ळूर : मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त गांधी भवन या ठिकाणी दुपारी ३.०० वाजता प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४ मध्ये मिळालेला होता. मराठी मॉडेल स्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या २६ वर्षापासून प्रामाणिकपणे झटत आहेत. त्यानी मागील चार वर्षे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून शाळेचा उत्तम कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *