
बेळगाव- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर आणि संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात होता. मंदिरासमोर आणि मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आले होते.

पहाटे साडेचार वाजता मंगल आरती , त्यानंतर तुलसी आरती, त्यानंतर जप आणि गुरु आरती, त्यानंतर हरी केशव प्रभू यांचे भागवत प्रवचन झाले त्यांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या अध्यायातील श्लोक सांगून त्यांचा भावार्थ कथन केला. “भगवंत कोण आहेत ते जाणून घेण्यासाठी श्रीमद् भागवत आहे. भगवंताचे स्वरूप हे जगाचे मंगल करणारे, कल्याण करणारे आहे’ असे म्हणाले.
दिवसभर मंदिरात भजन कीर्तन आधी कार्यक्रम झाले.
सायंकाळी पाच वाजल्या नंतर दीक्षित भक्तां कडून अभिषेक झाले. अभिषेक साठी मंडपात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बाजूलाच भगवान जगन्नाथ, बलदेव सुभद्रा, गौर निताई आणि राधा गोकुलनंद यांचे आर्च विग्रह ठेवण्यात आले होते भक्तानी त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या भक्तांनी बसवलेली नाट्यलीला सादर करण्यात आली.
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष कृष्ण कथा कथन झाल्यानंतर मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.
शनिवारी प्रभूपादांचा अविर्भाव दिन
शनिवारी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रभूपादांचा गुणगौरव, अभिषेक, प्रभूपादांची आरती, प्रभूपादांवर फुलांचा अभिषेक आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta