Sunday , September 20 2026
Breaking News

नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे प्रोत्साह फाउंडेशनतर्फे स्वागत

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे प्रोत्साह फाउंडेशनतर्फे शाल, पुष्पहार तसेच भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

शुक्रवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे परिसरात आयोजित स्वागत समारंभात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पोलीस आयुक्त निकम यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी प्रोत्साह फाउंडेशनचे पदाधिकारी संतोष होंगल सर, शंकरराव चव्हाण (गुरुजी), पी. जे. घाडी, हिरालाल चव्हाण, संजय चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या स्वागतासाठी आयोजित या समारंभात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *