
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर प्रेझेंन्ट कॉन्व्हेंट स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय फुटबॉल स्पर्धेत मुला मुलींच्या गटात संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादन केला
मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने डीपी शाळेचा अटीतटीच्या लढतीत 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या
समीक्षा खन्नुरकरच्या पासवर दीपिकाने एकमेव विजयी गोल केला.तर मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने चिटणीस शाळेचा शाळेचा 2-0 असा पराभव केला विजयी संघाच्या रक्षित गोरगौडाच्या पासवर श्रेयस चंदने पहिला गोल केला, तर अनिरुद्ध हलगेकरच्या पासवर रत्नाकरणे दुसरा गोल केला.
आता वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे निलेश पाटील, जेष्ठ फुटबॉल पंच गोपाळ खाडे, जयसिंग धनाजी, संतोष दळवी, प्रवीण पाटील, हर्ष रेडेकर, शिवकुमार सुतार, बापू देसाई, मॅन्युअल डिक्रुझ, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta