Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार सेठ यांची रस्त्यांची पाहणी

Spread the love

 

 

रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी गुरुवारी रात्री गणेश मिरवणूक मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

आमदार सेठ यांनी समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड तसेच कपिलेश्वर मंदिर परिसराला भेट देऊन रस्त्यांची सद्यस्थिती तपासली. गणेशोत्सवादरम्यान भाविक आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांचीही त्यांनी पाहणी केली.

गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींच्या मिरवणुका तसेच नागरिकांची वाहतूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी आवश्यक रस्ते दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उत्सवादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही आमदार सेठ यांनी सांगितले. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *