Sunday , September 20 2026
Breaking News

जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : न्यू वंटमुरी शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ बेळगावने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलाच्या गटात बेळगाव शहर संघाने अंतिम सामन्यात बेळगाव ग्रामीण तालुक्याच्या संघाचा 2-1 असा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच माध्यमिक मुलाच्या गटात संत मीरा अनगोळ बेळगाव शहर संघाने उपांत्य सामन्यात रामदुर्ग तालुक्याच्या संघाचा 15-0 अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.विजयी सघाच्या सचित धामणेकरने 4 गोल, उत्कर्ष कणसे 4 गोल, श्रेयस किल्लेकर 3 अनिरुद्ध हलगेकर 2, यश हळशीकर 1 गोल,अंतिम सामन्यातही संत मीरा बेळगाव शहर संघाने बेळगाव ग्रामीण तालुक्याच्या संघाचा 11-5 असा एकतर्फी पराभव करत प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघाच्या संचित धामणेकरने 3 गोल उत्कर्ष कणसेने 3 गोल अनिरुद्ध हलगेकरने 2 गोल, यश हळशीकरने 2 गोल, श्रेयश किल्ले करणे श्रेयस किल्लेकरने 1 गोल केला.
या शानदार कामगिरीमुळे प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही संघांची आगामी 15 व 16 सप्टेंबर रोजी बागलकोट येथे होणाऱ्या विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्राथमिक मुलाच्या विजेत्या संघात अर्णव हलगेकर, मयांक कलखाबकर, शशांक बजंत्री, वियम मोदगेकर, श्रेयस बडबंजी, समर्थ अंगडी, अथर्व होन्नूळकर, वेदांत अनगोळकर, स्वराज पाटील, माध्यमिक मुलाच्या विजेत्या संघात संचित धामणेकर, अनिरुद्ध हलगेकर, आर्यन कलखाबकर, मोहम्मद हरीस पिरजादे, यश हळशीकर, उत्कर्ष कणसे, पृथ्वीराज बजंत्री, कुणाल लोहार, प्रणव सुतार, तसेच सेट झेवियसच्या मुलाचा या संघात समावेश होता. या यशाबद्दल खेळाडूंना शाळेचे चेअरमन परमेश्वर हेगडे, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, यांचे प्रोत्साहन तर खेळाडूंना क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी व शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *