Monday , October 5 2026
Breaking News

आमदार अभय पाटील पुन्हा तेलंगणाच्या सहप्रभारीपदी; विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्षाने तेलंगणातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करत बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांची पुन्हा तेलंगणाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. पक्षाने २३ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नव्या संघटनात्मक रचनेनुसार सुनील बंसल यांच्याकडे तेलंगणाचे प्रभारीपद कायम ठेवण्यात आले असून, अभय पाटील आणि रेखा शर्मा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नव्या जबाबदारीनंतर अभय पाटील यांचे बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. यावेळी विमानतळ परिसरात मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभय पाटील यांच्याकडे यापूर्वीही तेलंगणातील पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. २०२४ मध्ये त्यांची तेलंगणासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्या भूमिकेचा विस्तार करत संघटनात्मक जबाबदारीही सोपविली होती. आता पुन्हा सहप्रभारीपदाची जबाबदारी देत पक्षाने त्यांच्या संघटनात्मक अनुभवावर आणि कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपच्या नव्या रचनेनुसार सुनील बंसल प्रभारी, तर अभय पाटील आणि रेखा शर्मा सहप्रभारी म्हणून तेलंगणातील पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात तेलंगणातील भाजपच्या संघटनात्मक विस्तारात अभय पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *