








बेळगाव : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात, यासाठी बेळगाव शहर पोलिस विभाग आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २४) शहरातील प्रमुख रस्ते तसेच संवेदनशील भागांत पथसंचलन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी विविध भागांत संचलन केले. यावेळी पोलिस आणि RAF जवानांनी प्रमुख मार्गांवरून संचलन करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखत पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव शहर पोलिस विभागाने केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta